समुद्रपूर तालुक्यात युवा शेतकऱ्याने कर्जबाजारीला कंटाळून केली आत्महत्या...
![समुद्रपूर तालुक्यात युवा शेतकऱ्याने कर्जबाजारीला कंटाळून केली आत्महत्या...](https://news15marathi.com/uploads/images/202210/image_750x_6337cf4d1ef13.jpg)
प्रतिनिधी : अमोल झाडे
वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील चाकुर गट ग्रामपंचायत अंतर्गत चाकुर येथील युवा शेतकरी अमोल पांडुरंगजी रोकडे या शेतकऱ्याने; कर्जबाजारीपणाला कंटाळून कीटकनाशक प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
गतवर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे शेतातील पिकांचे सर्वत्र नुकसान झाले असून, मृत पावलेले शेतकरी अमोल पांडुरंगजी रोकडे यांच्याकडे 2 एकर जमीन आहे. तसेच त्यांच्यावर बँकेचे व सावकाराचे 2 लाख कर्ज होते. सतत कर्जाच्या खाईत लोटल्या गेल्याने व दुसरीकडे अतिवृष्टीने जमीन खरडून गेल्याने, या विचारातून अमोल यांनी दि. 29 रोजी सकाळी घरी कोणी नसताना कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्यापश्चयात मागे पत्नी व 2 मुले असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी घाटनेस्थळी धाव घेत; आत्महत्येची नोंद घेतली असून, पुढील तपास ठाणेदार प्रशांत काळे करीत आहेत.
तर या घटनेनंतर नाम फाउंडेशन तालुका सम्वयक दिनेश जाधव यांनी हळहळ व्यक्त करत; बळीराजानो खचून जाऊ नका, तुमच्या जाण्याने तुमच्या परिवाराना मोठया संकटाच्या दारात सोडून प्रश्न सुटणार नाहीत.! कदाचित कुठे प्रश्न सुटत नसेल तर तालु्कयातील नाम मित्रांशी संपर्क साधा त्यातून मार्ग काढता येईल पण आत्महत्या हा पर्याप्त जीवनाचा मार्ग नाही अशी भावनिक साद शेतकरी बांधवांना घातली आहे.